बुधवार, १५ ऑगस्ट, २०१२

घोडपदेव श्रीकापरेश्वर मंदिर

                                                                  घोडपदेव नावाच माझे गाव आहे.धाकू प्रभुजी वाडी मध्ये माझे वास्तव्य ,खरं सांगायचं झाले तर माझा जन्म येथेच झाला. घोडपदेव मध्ये सर्व प्रांतातली मंडळी पण जास्त प्रामुख्याने मराठा. घाटी, कोकणी होती चर्मकार, महार वाडे वस्ती मुस्लीम वस्ती , ब्रुड (डवरी )समाज, मद्राशी, ख्रिश्चन आदि अनेक समूहाने राहणाऱ्या जाती जमाती. एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारी या  गावात अनेक मंदिरे आहेत.   प्रामुख्याने  श्री घोडपदेव मंदिर आणि श्रीकापरेश्वर मंदिर आहेत .दरवर्षी  वार्षिकोत्सव होत असतो  श्रीकापरेश्वर मंदिर येथे यात्रा भरली जाते यात्रा म्हणजे एखाद्या खेड्याला लाजवील अशी यात्रा. अखंड हरीनाम सप्ताहात प्रवचने कीर्तने दिवसभर   विविध कार्यक्रम सतत सुरु असल्यामुळे वातावरण धार्मिक स्वरूपाचे होते गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला श्रीकापरेश्वराची पालखी पूर्णत:  घोडपदेवला प्रदषिणा नाचत गाजत  घालते. देवाची काठी नाचविणे हा एक प्रकार या पालखीत दिसून येतो. या देवकाठी घेण्यासाठी झुंबड उडत असे.आज जमाना हळूहळू बदलत आहे. परंपराचे पानिपत होत चालले आहे. देवकाठी ऐवजी धांगड धिंगा घालणारा नवा जमाना उदयास येत चालला आहे. देवकाठीचे महात्म्य काय! याचा सारासार विचार कोणी करण्याचा अट्टाहास करीत नाही.आज न उद्या याचा विचार होईल त्याचे महत्व
 नक्की 
कळेल.
                       सात ते आठ दिवस कीर्तन सेवा होते महाराष्ट्रातील आदरणीय, वंदनीय हरीभक्त परायणकर समाजप्रबोधन
 करण्यासाठी येतात. कीर्तनकार म्हणजे   ज्ञानाचे महासागर. किती मंथन केले तरी यांची झोळी रिती होणे शक्य नाही., मोफत  सद्विचारांच्या बाजारात कोणी किती घ्यावं
 हे प्रत्येक जण ठरविणार.टाळकरी ,माळकरी , वारकरी,फडकरी, मृदुन्गाचार्य, श्रोत्यांची अफाट गर्दी.... दूरदूरचे लोक येतात    यात्रोत्सावाची    शोभा वाढवितात. गर्दीने रस्ते फुलून जातात. रस्त्याच्या कडेला खेळणी वाले ..........पाळणे वाले.... रेवड्या शिंगुल्याच्या गाड्या  अन त्यावर  ताव मनसोक्त  मारणारी आबालवृद्ध मंडळी .... गर्दीच गर्दी ..... इकडे तिकडे चोहीकडे ..आनंदी आनंद गडे ... असा  यात्रोत्सव मुंबई शहरात अगदी थोडक्या ठिकाणी  केला  जातो. दिवसेंदिवस हे सोहळे खर्चिक होत चालल्याने अवघड वाटू लागले आहे. परंपराचे पानिपत होणार  हा उल्लेख या साठी    करावासा वाटतो. श्रद्धाळू आहेत म्हणून देणग्या मिळत आहेत अन्यथा ...... तुम्हाला ठाऊक आहे।..... विशेष म्हणजे श्रीकापरेश्वर बाबा उत्सवासाठी काही कमी पडून देत नाही .. असे म्हटले जाते . आयोजक मंडळी याचा सतत उलगडा करतात अन लोकभावना जागृत होतात काही कळत नकळत खिश्यात हात घालतात ..... काही मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करतात अन  दानपेटी जड करतात.
             घोडपदेव आता गांव नाही. जुन्या चाळींच अस्तित्व धोक्यात आले आहे. बिल्डर नावाचा राक्षस चाळी गिळंकृत करीत चालला आहे.चाळींच्या जागी भव्य दिव्य टॉवर उभारण्याचे मनसुबे काही चाळ प्रतिनिधीना घेऊन करीत आहे. बदल्यात प्रतिनिधीना चांगल्या
बळी पडत आहेत .विकासाच्या नावाखाली राजकारण सुरु आहे. विकास होणे गरजेचे आहे परंतु तुटपुंज्या पगारात कसे बसे घर चालविणारे चाकरमानी टॉवर मधल्या घरात आनंदाने राहतील का! हा प्रश्न भेडसावणारा आहे.
       घोडपदेव मध्ये सध्या एकच विषय रस्तोरस्ती, गल्लोगल्ली सुरु आहे. devolopment  ज्याला काय कळत नाही तो देखील devolopment च्या विषयावर बोलतो आहे कधी बापजन्मी कोणते नियम
 कायदे वाचले   नसतील तो देखील  विकासाच्या तोंडभरून गप्पा झोडीत असतो.साधे ज्याला समाजाविषयी
 काही सोयरसुतक नाही तो देखील या विषयात मात्र पुढे पुढे करीत असतो. या विषयाने घोडपदेव करांना वेडे केले आहे.
घर मोठे हवे ......! कॉर्पस फंड मोठा हवा .......! घरभाडे जादा हवे.......! mou, (Memorandm of  unerstanding ) Devolopment Agreement चांगल्या वकिलाकडून करून घ्यायचे बरं का.........!
 वास्तुविशारद आपल्या पसंतीतील हवा......!   हाच तो विषय मोगऱ्याच्या सुवासाप्रमाणे दरवळतो आहे.
               नवीन विकसित झालेल्या एका चाळीतील रहिवाश्यांनी टॉवर चा ताबा घेण्यापूर्वी 20%  खोल्या विकल्या गेल्या . उद्याचं भवितव्य त्यांना अंधकारमय वाटू लागले असावे किंवा किंमत चांगली मिळाली म्हणून
 खोल्या विकल्या असाव्यात. जुनेजाणते मराठमोळे   रहिवाशी जाणार अन नवनवी माणसं ,नव्या जाती जमाती येणार.  नव्या परंपराचं उधान येणार.
हळूहळू  पंरपरांगात श्री कापरेश्वर उत्सवाचे काय होणार! चिंतेचा विषय नाही कारण               
  श्रीकापरेश्वर बाबा समर्थ आहे.